देशातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणार्या जिल्हा सहकारी बँका व नागरी सहकारी बँका यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने दरवर्षी बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार देण्यात येते. सन २०२१ या वर्षाचा भारतातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या एकूण व्यवसाय श्रेणीतील ‘बँको ब्ल्यू रिबन ‘ प्रथम पुरस्कार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग सहाव्यांदा जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २ जून २०२२ रोजी लोणावळा येथे होणार असून या कार्यक्रमात बँकेला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
देशातील ३७९ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीतून ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षात २ हजार ते २ हजार ५० कोटीच्या ठेवी असलेल्या श्रेणीमध्ये गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेव सृष्टी तसेच रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार बँकेने आर्थिक निकषात उल्लेखनीय कार्य केल्याबद्द्ल बँको समितीने राष्ट्रीय स्तरावरचा सन २०२१ या वर्षाचा ‘बँको ब्ल्यू रिबन’ प्रथम पुरस्कार जाहीर केलेला आहे.