बँकिंग फ्रंटिअर्सतर्फे नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समीटतर्फे दरवर्षी देशातील बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरी सहकारी बँकांना बँकिंग क्षेत्रातील विविध प्रकारच्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मनित केले जाते. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन्मानित करण्यात आले.
१७ ऑक्टोबर रोजी नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग समेट इंदोर येथे आयोजित पुरस्कार कार्यक्रमात नाबार्डचे महाप्रबंधक सुरेश कुमार यांच्या हस्ते बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी स्वीकारला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर सतीश मराठे आदी उपस्थित होते.