दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२१-२२ या वर्षात आर्थिक समावेशन व महिला बचत गट बँक लिंकेज संलग्नता कर्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नाबार्डतर्फे राज्यस्तरिय पुरस्कार बँकेला जाहीर झालेला आहे. १२ जुलै रोजी नाबार्ड स्थापना दिवसाचे औचित्य साधून १५ जुलै २०२२ रोजी नाबार्ड महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय पुणे येथे सदर पुरस्कार केला वितरीत करण्यात येणार आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, कृषी विभागाचे आयुक्त धीरज कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, रिझर्व्ह बँकेचे विभागीय संचालक अजय मिथ्यारी, नाबार्ड पूणेचे मुख्य महप्रबंधक गोवर्धन रावत यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.