देशातील ७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या जिल्हा सहकारी बँकांना बँको पुणे तर्फे सन २०२०–२१ या वर्षाचा ‘बँको ब्ल्यू रिबन – २०२१’ प्रथम पुरस्कार दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच प्रदान करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक डी. जी. काळे यांच्या हस्ते दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश आयलवार यांनी पुरस्कार स्वीकारला.
लोणावळा येथे २ जून २०२२ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला देशातील ७० जिल्हा सहकारी बँकांचे व ९० नागरी सहकारी बँकांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते. देशातील २७० जिल्हा सहकारी बँकामधून रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निकषानुसार उत्कृष्टपणे काम करणार्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दरवर्षी बँको पुरस्कार दिला जातो. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेने ‘ठेव वृध्दि श्रेणी’ मध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल बँकेला प्रथम पुरस्कार देशातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या श्रेणीतून ‘बँको ब्ल्यू रिबन-२०२१’ दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला प्रदान करण्यात आला.