भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्डच्या वित्तिय समावेशन कार्यक्रमा अंतर्गत मोबाईलव्दारे दुर्गम भागातील लोकांपर्यत विविध योजनांची माहिती व बँकींग सुविधेचा लाभ घेण्याकरिता ग्रामीण भागातील लोकांनी बँकेच्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात सहभागी व्हावे असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेष्ठ संचालक अरविंद पोरेड्डिवार यांनी केले.
आर्थिक साक्षरता कार्यक्रमांतर्गत नाबार्ड, महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पुणे याचेतर्फे औरंगाबाद येथे वित्तिय समावेश अभियानाचा शुभारंभ केंद्र सरकारचे वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते व नाबार्डचे मुख्य महाप्रबंधक गोवर्धन रावत यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी पध्दतीव्दारे महाराष्ट्रातील जिल्हा बँक व ग्रामीण बँक यांना वितरीत केलेले मोबाईल व्हॅनच लोकर्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी गडचिरोली जिल्हा बँकेला नाबार्डतर्फे आर्थिक साक्षरता कार्यक्रमकरिता दिलेल्या दोन मोबाईल व्हॅनचा शुभारंभ बँकेचे जेष्ठ संचालक अरविंद सा. पोरेड्डिवार यांच्या हस्ते गडचिरोली जिल्हा बँकेच्या प्रांगणात झाला.